कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमागे सर्वात महत्त्वाचं कारण ठरलंय ते को-मॉर्बिडिटी. सामान्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, को-मॉर्बिडिटी म्हणजे ज्या व्यक्तीला मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग आणि किडनी विकार यासारखे आजार आहेत.
या आजारांनी ग्रस्त रुग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, शरीरातील सारखेच्या प्रमाणावर नसलेल्या नियंत्रणामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते.
भारतात कोरोना व्हायरसमुळे 8 हजारपेक्षा जास्त, तर महाराष्ट्रात 3391 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पण याची वर्गवारी जास्त धक्कादायक आहे.
राज्य सरकारच्या माहितीनुसार,
राज्यात 11 जूनपर्यंत 3391 कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत.
ज्यातील 2360 रुग्ण को-मॉर्बिड म्हणजे जुने आजार असलेले व्यक्ती होते. तर 70 टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू को-मॉर्बिडिटीमुळे झाल्याचे निष्पन्न झााले आहे. दरम्यान अश्या व्यक्तींनी जास्तीची खबरदारी घेणे आवश्यक आहे.