दापोली दि.२६ – आज कोकणाच्या राजकारणाचा पारा कडाक्याच्या उन्हाच्या पाऱ्यापेक्षाही जास्त चढलाय. किरीट सोमय्यांच्या कोकण दौऱ्यानं कोकणातलं राजकारण सध्या ढवळून निघालंय. अनिल परबांचं कथित रिसॉर्ट पाडण्यासाठी सोमय्या कोकणात पोहोचले. सुरूवातील किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवलं, राष्ट्रवादीचा विरोध झाला. तरीही सोमय्या कोकणात पोहोचले. त्यांना लगेज भाजप नेते निलेश राणे जॉईन झाले. दोघांनी मिळून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. मात्र यावेळी फक्त हे दोन्ही नेतेच नाही तर मोठा फौजफाटाही सोबत दिसून आला. या दोन रिसॉर्टचा वाद राज्यातल्या घराघरात आज पोहोचला आहे. या दोन रिसॉर्टविरोधात मैदानात उतरलेले दोन नेते, किरीट सोमय्या आणि निलेश राणे सरकारवर तुटून पडत आहे. मात्र हे दोन नेतेच नाही. तर तब्बल 200 गाड्या आणि 400 कार्यकर्ते दापोलीत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनाही नेमकं काय करावं आणि काही नाही, हे समजायला थोडा वेळ लागला.
दापोलीत किरीट सोमय्या, निलेश राणे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात……!
मात्र किरीट सोमय्या आणि निलेश राणे हे अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तीन तास दापोलीच्या पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. तसेच त्यानंतर सोमय्या आणि निलेश राणे, निल सोमय्या हे पायी रिसीर्ट कडे पायी जात असताना अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. आता यापुढे नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.