Site icon सक्रिय न्यूज

मृत्यूशी झुंज अपयशी, पाच दिवसांचा उपचारानंतर शेतकऱ्याने सोडला प्राण…..!

मृत्यूशी झुंज अपयशी, पाच दिवसांचा उपचारानंतर शेतकऱ्याने सोडला प्राण…..!
केज दि.३१ – शेतातील नापिकीला कंटाळून एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन केले. मात्र ५ दिवसाच्या उपचारानंतर या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील भाटुंबा घडली. तुकाराम गोविंद गव्हाणे असे या मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
     केज तालुक्यातील भाटुंबा येथील तरुण शेतकरी तुकाराम गोविंद गव्हाणे ( वय ३८ ) यांनी शेतातील नापिकीला कंटाळून टोकाची भूमिका घेत २५ मार्च रोजी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना ३० मार्च रोजी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास तुकाराम गव्हाणे यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शेअर करा
Exit mobile version