केज दि.१ – गेली दोन वर्ष आजाराशी सामना करीत असलेल्या महादेव मेटे यांच्या पत्नी सौ. जयश्री मेटे वय (४५ वर्ष) यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली आणि त्यांनी प्राण सोडले.
केज तालुक्यातील राजेगाव येथील एका सामान्य कुटुंबातील जयश्री महादेव मेटे वय (४५ वर्ष) या मागील दोन वर्षा पासून आजारी होत्या. एक वर्षा पूर्वी त्यांच्या मेंदूतील गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान मागील आठवड्यात त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते. परंतु त्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. म्हणून दि.३१ मार्च रोजी त्यांना बार्शी येथून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालयात व ग्रामीण रुग्णालयात हलविले होते. मात्र आजार गंभीर असल्याने त्याची प्रकृती खालावली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले होते.त्यातच दि १ एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी ९:४५ दरम्यान त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी राजेगाव येथे शेतात अग्नीसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक आणि अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते. जयश्री मेटे या खूप प्रेमळ आणि मनमिळावू स्वभाच्या असल्याने त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती महादेव मेटे, मुले विजय व कृष्णा आणि एक सून, सासू सासरे, दिर, जाऊ, नणंद असा परिवार असून त्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. शारदाताई गुंड यांच्या भावजई होत्या.