मुंबई दि.३ – अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात झाली. राज ठाकरेंनी राज्याला अपेक्षित असलेल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राज ठाकरेंनी परत एकदा आपला मोर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात खऱ्या अर्थाने जाती-पातीच्या राजकारणाला सुरूवात झाली. शरद पवार हेच राज्यात जातीच्या राजकारणाला जबाबदार आहेत, अशी जहरी टीका राज ठाकरेंनी केली आहे. परिणामी राज्यात परत एकदा राज ठाकरे विरूद्ध राष्ट्रवादी असा तुफान वाद रंगण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनीच जेम्स लेनच्या प्रकरणाला हवा देण्याचं काम केलं, असा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे. आपल्या मतदानासाठी ब्राम्हणांना लक्ष्य केलं गेलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे फक्त ब्राम्हण होते म्हणून त्यांच्या साहित्यावर टीका करण्यात आली, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.