Site icon सक्रिय न्यूज

जगात जर्मनी अन भारतात परभणी का म्हणत असतील असे ?

केज दि.१७ – जगात जर्मनी अन भारतात परभणी अशी म्हण कित्येक वेळा आपल्या कानावर पडते. का बरं म्हणत असतील असं….? देव जाणे….! मात्र या म्हणीशीच मिळता जुळता प्रसंग समोर आला असून सध्या भारत देशात सर्वात महाग इंधन (पेट्रोल, डिझेल) हे परभणीत आहे. मग अश्याच कांही वेगळ्या गोष्टीसाठी म्हणत असतील का तसे…….?
             मराठवाडयात जश्या अन्य कांही म्हणी प्रचलित आहेत तशीच म्हण ”जगात जर्मनी अन भारतात परभणी” अशी प्रचलित आहे. कित्येकवेळा ही म्हण आपल्या कानावर पडते. मात्र असं का म्हणत असतील याचा कुणाला थांगपत्ता बहुतेक नसावा. मात्र सध्या परभणी एका विशिष्ट कारणासाठी चर्चेत आहे आणि ती म्हणजे सर्वात महाग विक्री होत असलेल्या इंधनामुळे…..!
त्याचे कारणही तसेच असून पंधरा वर्षांपूर्वी परभणीला इंधनाचा पुरवठा औरंगाबाद येथून होत होता. आणि औरंगाबाद ते परभणी हे अंतर जवळ असल्याने इतर ठिकानां प्रमाणेच इंधन विकल्या जात होते. मात्र अचानक औरंगाबादहून होणारा पुरवठा बंद झाला आणि तो होऊ लागला मनमाड वरून. मनमाड आणि परभणी अंतर जास्त असल्याने अर्थातच वाहतुकीचा खर्च वाढला आणि तो अधिभार इंधन विक्रीवर बसल्याने किमतीत वाढ झाली. त्यामुळे हा भार अप्रत्यक्षरीत्या ग्राहकांवर बसत असून देशात सर्वात महाग  दराने इंधन विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे जगात जर्मनी अन भारतात परभणी असे म्हणतात ते कांही खोटे वाटत नाही.
शेअर करा
Exit mobile version