केज दि.४ – जुन्या भांडणाची कुरापत काढून एकास लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत पाय फ्रॅक्चर केल्याची घटना घडल्यावरून चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील धनेगाव कॅम्प येथे दि.२७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नितीन किसन सोनवणे, लक्ष्मण पांडू सोनवणे, पप्पू पांडू सोनवणे व विजू मस्सा सोनवणे यांनी पिराजी मालाजी सोनवणे यास जुन्या भांडणाची कुरापत काढून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तर लक्ष्मण सोनवणे याने पिराजी याच्या पायावर लोखंडी गजाने मारहाण केली यात पिराजीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
पिराजी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वरील चौघां विरोधात युसुफ वडगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल श्री.पिंपळे हे करत आहेत.