मुंबई दि.5 – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.
दरम्यान अलिबाग मध्ये आमच्या स्वकष्टाच्या पैशाने खरेदी केलेली एक एक्कारपेक्षा कमी जागा असून दादर मधील आमचे राहते घरही जप्त केल्याचे मी ऐकले आहे. तसेच राजकीय सूडबुद्धीने केलेली ही कारवाई असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.