Site icon सक्रिय न्यूज

कोरोनातून बरे झाल्यानंतर कालांतराने ”ही” लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा…..!

कोरोनातून बरे झाल्यानंतर कालांतराने ”ही” लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा…..!

 कोरोनाचा शिरकाव कमी झालेला असला तरी अद्याप कोरोना संपूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं सांगितलं जात आहे. अशातच कोरोविषयी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

कोरोना महासाथीच्या लक्षणांविषयी WHOनं महत्त्वाची माहिती सांगितली आहे. WHO च्या यादीनुसार, भ्रम हे गंभीर लक्षण म्हणून सूचीबद्ध केलं गेलं आहे आणि कोणालाही याचा त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्मरणशक्ती किंवा एकाग्रतेमध्ये समस्या येतात तेव्हा त्याला दीर्घ कोविडचे लक्षण म्हणून ओळखलं जातं. या भ्रमाला ‘ब्रेन फॉग’ असंही म्हटलं जातं.

दरम्यान, संपूर्ण राज्यभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

शेअर करा
Exit mobile version