मुंबई दि.8 – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. दुपारी झालेल्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आता पोलीस अटक करणार की नाही हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल
गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज झालेल्या आंदोलनात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. त्यामुळे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर त्यामुळे आयपीसी कलम 353 (सरकारी कामात अडथळा, 120 B समान हेतू) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यावेळी सदावर्ते यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचे म्हणत त्याला सर्वस्वी जबाबदार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे जबाबदार असे म्हटले आहे.