Site icon सक्रिय न्यूज

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी तर इतरांना न्यायालयीन कोठडी…..!

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी तर इतरांना न्यायालयीन कोठडी…..!
मुंबई दि.९ – एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी दिली आहे. त्यानंतर सदावर्ते यांचे वकील ॲड. महेश वासवानी यांनी मीडियाशी संवाद साधला.
                   आम्ही सदावर्तेना कोठडी देण्यास विरोध केला होता. सदावर्ते यांच्याकडून कोणतीही रिकव्हरी करायची नाही. तसेच ते पळूनही जाणार नाही. त्यांचं घर मुंबईत आहे. ते साक्षीदारांवरही दबाव आणणार नाहीत. त्यामुळे त्यांना कोठडी देऊ नये असं आम्ही कोर्टाला सांगितलं. मात्र, एफआयआरमध्ये षडयंत्राची कलम टाकण्यात आल्याने ते तपासण्यासाठी सदावर्तेना पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती वासवानी यांनी दिली. तसेच यात काही निष्पन्न झालं तर एसटी कर्मचाऱ्यांनाही पुन्हा कोठडी दिली जाणार असल्याचं कोर्टाने म्हटल्याचं वासवानी यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, किल्ला कोर्टाने आज सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून एसटी कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाने कोठडी सुनावल्यानंतर महेश वासवानी यांनी मीडियाशी संवाद साधला.
               सदावर्ते प्रकरणावर अडीच तीन तास सुनावणी झाली. ज्या दिवशी घटना घडली त्यावेळी सदावर्ते हे न्यायाधीस मृदुला भाटकर यांच्या कोर्टात युक्तिवाद करत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांचा कोणताच रोल नाही. आम्ही सर्व प्रकारच्या हिंसेला विरोध करतो. त्याला प्रोत्साहन देत नाही, असं आम्ही कोर्टाला सांगितलं, अशी माहिती वासवानी यांनी दिली.
                  सदावर्तेंना अटक केल्यानंतर त्यांना कोठडी देण्याची गरज नाही. त्यांच्याकडून काही रिकव्हरी करायची नाही. ते कोर्ट सोडून पळून जाणार नाही, त्यांचं घर फिक्स आहे. कोणत्याही साक्षीदारावर ते दबाव आणणार नाहीत. पोलिसांनीही या गोष्टी म्हटल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बेल द्यावी, अशी कोर्टाला विनंती केली. तसेच यावेळी कोर्टाला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखलेही दिले, असं त्यांनी सांगितलं. मात्र षडयंत्राचं कलम लावल्यामुळे कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी दिली. तसेच इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी दिली. षडयंत्रं प्रकरणी काही माहिती मिळाली तर या आरोपींना पुन्हा कोठडी दिली जाईल, असं महेश वासवानी यांनी सांगितलं.
शेअर करा
Exit mobile version