Site icon सक्रिय न्यूज

तालुक्यात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती ठिकठिकाणी साजरी…..!

तालुक्यात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती ठिकठिकाणी साजरी…..!
केज दि.११ – तालुक्यात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तालुक्यात ठिकठिकाणी साजरी करून त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करण्यात आले.
               शहरातील संत सावता महाराज मंदिरात दुपारी जयंतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फुले विचारांना उजाळा देण्यात आला. तर तालुक्यातील सारणी (आ) येथील पुरुषोत्तमदादा सोनवणे विद्यालयातही जयंतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य पी.एच. लोमटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
             तसेच शहरातील न्यू इंटेल कॉम्प्युटर्स मध्येही जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार डी. डी. बनसोडे, डॉ. हनुमंत सौदागर यांच्यासह संचालक गणेश सत्वधर,विजया सत्वधर यांच्यासह विद्यार्थी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version