Site icon सक्रिय न्यूज

इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात……!

इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात……!

जालना दि.14 – किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला.सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

               जालना जिल्ह्यातील परतूर येथे इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली असल्याची माहिती आहे. काल ते जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. यात चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

                  ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाला परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात असतांना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला.
शेअर करा
Exit mobile version