Site icon सक्रिय न्यूज

विवाहितेच्या आत्महत्ते प्रकरणी पती व सासरा पोलिसांच्या ताब्यात…..!

विवाहितेच्या आत्महत्ते प्रकरणी पती व सासरा पोलिसांच्या ताब्यात…..!
केज दि.१६ – ट्रक घेण्यासाठी माहेरहून चार लाख रु घेऊन ये; म्हणून विवाहीतेचा तिच्या सासरच्या लोकांनी छळ केल्यामुळे केज तालुक्यातील नाव्होली येथे एका १९ वर्षीय विवाहितेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
                     लाखा ता. केज येथील बाबासाहेब घाडगे यांची मुलगी राधा हिचा विवाह नाव्होली ता. केज येथील अशोक वामन वरपे यांच्या सोबत झाला होता. सौ. राधा अशोक वरपे हिला तिचा नवरा अशोक वरपे व सासू, सासरा व नात्यातील महिला यांनी संगनमत करून तिला मारहाण केली. तसेच ट्रक घेण्यासाठी माहेरहून चार लाख रु. घेऊन ये म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यातच दि. १५ एप्रिल रोजी दुपारी ३:०० वा. राधा अशोक वरपे हिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्त्या केली. मयत राधा हिला सव्वा वर्ष वयाची एक मुलगी आहे.
            सदर प्रकरणी मयत राधा हिचा भाऊ सागर घाडगे यांच्या फिर्यादी वरून दि. १६ एप्रिल रोजी केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२२/२०२२ भा.दं.वि. ४९८ (अ), ३०६, ३२३, ५०४ व ३४ नुसार तिचा नवराअशोक वामण वरपे, सासरा वामन दादाराव वरपे, सासु मीराबाई वामन वरपे आणि मावस सासु मंदाकीनी लक्ष्मण दातार यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलीसांनी मयताचा नवरा अशोक वरपे व सासरा वामन वरपे या दोघांना ताब्यात घेतले आहे.
शेअर करा
Exit mobile version