Site icon सक्रिय न्यूज

कुलूप तोडून ३ लाख २० हजाराची रक्कम लंपास…..! 

कुलूप तोडून ३ लाख २० हजाराची रक्कम लंपास…..! 
केज दि.१८ – एका स्टील कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ३ लाख २० हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना सनगाव ( ता. अंबाजोगाई ) शिवारात १८ एप्रिल रोजी पहाटे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
        अंबाजोगाई येथील हनुमंत पांडुरंग सोळुंके यांची अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव शिवारात संकेत स्टील इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. सोळुंके यांनी कंपनीच्या कार्यालयातील कपाटात ३ लाख २० हजार रुपयांची रक्कम ठेवली होती. १८ एप्रिल रोजी पहाटे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या कंपनीच्या कंपाउंडची लोखंडी जाळी तोडून कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश करीत झडती घेतली. कार्यालयातील कपाट तोडून कपाटात ठेवलेली ३ लाख २० हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. कंपनीचे मालक हनुमंत सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात फौजदार शेख पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version