मुंबई दि.20 – संजय राऊत यांना न्यायालयावर टीका करणे भोवण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या विरोधात बार असोसिएशनने अवमान याचिका दाखल केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर तसेच भाजप नेत्यांना न्यायालयाकडून झुकतं माप दिलं जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच फक्त भाजपाच्याच नेत्यांना दिलासा मिळतो, जामीन मंजूर होतो. त्यामुळं जनतेचा न्यायालयाच्या निर्णयाकडे बघण्याचा दृष्टोकन संशयास्पद असल्याचे राऊत म्हणालेत.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्यासोबत, रश्मी ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनाही याचिकेत प्रतिवादी केले आहे. न्यायालयाने सुमोटो अवमान याचिका दाखल करुन राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.