बीड दि.२० – विदर्भ मराठवाड्यासह राज्यात तापमानाचा पारा चढाच आहे. उष्णतेने लाही लाही होणाऱ्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.कारण हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या काही भागात उद्या म्हणजेच २१ एप्रिल पासून पाऊस हजेरी लावणार आहे.मात्र हा पाऊस अवकाळी असल्यामुळे वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह काही भागात पाऊस होणार आहे. त्यामुळे राज्यातील २१ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. हा पाऊस दिनांक 21 एप्रिल पासून 23 एप्रिल पर्यंत बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
उद्या दिनांक 21 एप्रिल रोजी बुलढाणा, वाशिम, अकोला ,यवतमाळ, अमरावती, वर्धा ,चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे, रत्नागिरी, सातारा ,सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून या संपूर्ण भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. दिनांक 22 एप्रिल रोजी हिंगोली, नांदेड, लातूर ,उस्मानाबाद ,सोलापूर, सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना अलर्ट दिला गेला असून या भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वाशीम, यवतमाळ ,वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागात पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, दिनांक 23 एप्रिल रोजी वाशिम, परभणी, हिंगोली ,नांदेड, सोलापूर, पुणे ,सातारा ,सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल तर यवतमाळ ,वर्धा ,नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली ,भंडारा आणि गोंदिया या भागात पाऊस हजेरी लावेल.