Site icon सक्रिय न्यूज

खंडणी मागितल्या प्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या तक्रारीवरून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल…..!

खंडणी मागितल्या प्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या तक्रारीवरून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल…..!

मुंबई दि.२१ – मंत्री धनंजय मुंडे  यांच्याकडून खंडणी मगितल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती.त्यानुसार पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एका परिचित महिलेने 5 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार धनंजय मुंडे यांनी दिली होती. खंडणी न दिल्यास बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी या महिलेविरोधात आपल्या तक्रारीत केला आहे. मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या क्राईम ब्रांचला वर्ग करून तपासाला देण्यात आलंय. सध्या क्राईम ब्रांच पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, खंडणी मागून धनंजय मुंडे यांना धमकावणारी ही महिला कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.

                        फेब्रुवारी ते मार्च महिन्यात तक्रार करण्यात आलेल्या महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन केला होता.इंटरनॅशनल कॉल करुन 5 कोटींचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी या महिलेनं केल्याची तक्रार धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलीमागणी पूर्ण न केल्या सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी मुंडेंना देण्यात आली होती.धनंजय मुंडे यांनी या धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये आणि महागडा मोबाईलही कुरियरद्वारे पाठवला होता.मात्र तरीही महिला आणखी 5 कोटींच्या ऐवजाची मागणी करत होती. त्यामुळे धनंजय मुंडेंनी तक्रार केल्याचं समजतंय.धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.

शेअर करा
Exit mobile version