बीड दि.२२ – एका झाडाखाली बसून झंना मन्ना नावाचा अंदर बाहर जुगार खेळणाऱ्या चौघांना एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने तालुक्यातील लिंबागणेश येथून अंदर केले तर दहा जणांनी पळ काढला असून एकूण चौदाजणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 21/04/2022 रोजी सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी मिळाली की, लिंबागणेश येथे शिवाजी शिंदे व मधुकर बांगर हे आपले स्वतःच्या फायद्या करिता विनापरवाना बेकायदेशीररित्या काही इसमांना गोवर्धन वाणी यांचे शेतात मक्याच्या शेती जवळील लिंबाचे झाडाखाली गोलाकार एकत्र बसून पैशावर झना मन्ना नावाचा अंदर बहार जुगार खेळत खेळवत आहेत.सदरील माहिती त्यांच्या पथकातील जमादार यांना देऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सायंकाळी 5 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी झना मन्ना जुगार खेळणारे 4 इसम जागीच मिळून आले व इतर 10 जण पळून गेले. यावेळी सदरील इसमांच्या ताब्यात झना मन्ना जुगाराचे साहित्य व नगदी 45 220 रुपये व चार मोटारसायकली 2 50 000 हजार रुपये असा एकूण 295 220 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
दरम्यान एकूण 14 आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे नेकनुर येथे बालाजी दराडे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, रामहरी भांडणे संजय टूले यांनी केली.