महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून आता ३० एप्रिलपर्यंत अर्ज भरता येईल, तर २ मेपर्यंत शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. मात्र कोरोना प्रादुर्भाव आणि टीईटी गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या पोलिस तपासामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा २० जुलैला राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी पाचवी आणि आठवीची परीक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.