केज दि.२६ – दहिफळ ( वडमाऊली ) येथे केज पोलिसांनी छापा मारून २ हजार ३४० रुपयांच्या ५२ देशी, विदेशी दारूच्या बाटल्या पकडल्या. याप्रकरणी एक जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दहिफळ ( वडमाऊली ) येथे विनापरवाना व चोरून देशी, विदेशी दारू विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, जमादार उमेश आघाव, पोलीस नाईक अशोक नामदास, मतीन शेख यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी छापा मारला. यावेळी महादेव ज्ञानेबा मुंडे ( रा. दहीफळ वडमाऊली ता. केज ) हा देशी – विदेशी दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे देशी दारूच्या ४५ बाटल्या व ऑफिसर चॉईस विदेशी दारूच्या ७ बाटल्या सापडल्याने २ हजार ३४० रुपयांची ही दारू जप्त करण्यात आली. जमादार उमेश आघाव यांच्या फिर्यादीवरून महादेव मुंडे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक अशोक नामदास तपास करत आहेत.