Site icon सक्रिय न्यूज

केजडी पुलाजवळ मृतदेह आढळला……!

केजडी पुलाजवळ मृतदेह आढळला……!
केज दि.२८ – शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या केजडी पुलाजवळ (दि.28) नदीपात्रात पुरुष जातीचा मृतदेह आढळला असून सदरील मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
               केजडी पुलाजवळ असलेल्या पाण्याच्या डोहात पुरुष जातीचा मृतदेह फुगून वर आल्याचे निदर्शनास आले आहे. सदरील मृतदेह दिसून आल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली असून पोलीस घटनास्थळी पीएसआय सह पोलीस कर्मचारी अहंकारे, सोनवणे इत्यादी दाखल झाले आहेत.
             दरम्यान सदरील व्यक्ती दोन दिवसांपासून गायब असल्याची तक्रार केज पोलीसांत दिल्याची माहिती आहे.
शेअर करा
Exit mobile version