केज दि. 28 – घराचा दरवाजा उचकटून घरातील कोठीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना तालुक्यातील केवड येथे दि.27 रोजीच्या रात्री 9 ते 3.30 च्या दरम्यान घडली.
केवड येथे रात्रीच्या वेळेस सतीश महादेव पटाईत यांच्या घराचा दरवाजा उचकटून घरातील कोठीत ठेवलेले पाच ग्रॅमची सोन्याची बदामी अंगठी, एक साडेचार ग्रामचे सोन्याचे मनी मंगळसुत्र तसेच 14500 रुपये रोख असा एकूण 43000 रुपयाचा माल चोरीस गेल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, सतीश पटाईत यांच्या फिर्यादीवरून केज पोलीसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून एपीआय शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. गवळी हे पुढील तपास करत आहेत.