मुंबई दि.२९ – देशात वाढत असलेल्या बेरोजगारीवरून राजकारण तापलेलं असताना आता ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 18 ते 45 वयोगटातील बेरोजगारांसाठी ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेत असल्याचं घोषित केलं आहे.
नोकरी लागेपर्यंत 5 हजार रूपये भत्ता मिळणार आहे. रोजगार हवी असलेली व्यक्ती पात्र आहे. बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी काही अटी आणि शर्थी ठेवण्यात आल्या आहेत. राज्य सरकार बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था तयार करणार आहे.
बेरोजगार व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. त्या व्यक्तीचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ४० वर्षापेक्षा अधिक नसावे. अर्जदाराने राज्याच्या सेवायोजन केंद्रात नाव नोंदविणे आवश्यक, अशी नाव नोंदणी झालेल्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत तिला नोकरी मिळालेली नाही अशी व्यक्ती. किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १० वी/उच्च माध्यमिक/पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर इतकी असावी. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
दरम्यान, शासनाकडून लवकरच बेरोजगार भत्त्याबाबत नियमावली जाहीर होणार आहे. या नियमावलीनूसार बेरोजगार भत्ता योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असणार आहे.