Site icon सक्रिय न्यूज

केज पोलिसांनी पाठलाग करून पकडला टिप्पर……!

केज पोलिसांनी पाठलाग करून पकडला टिप्पर……!
केज दि.२९ – क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाळू वाहतूक करणारे टिप्पर आढळून आल्याने केज पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता ताब्यात घेतले असून पोलीस आणि महसूल प्रशासन पुढील कारवाई करत आहे.
                अवैध रेती वाहतूक करणारा हायवा (MH १४ GD ९९१९) माजलगाव कडून कळंब कडे जात असताना दिसून आल्याने एपीआय शंकर वाघमोडे यांच्या सूचनेवरून पोलीस कर्मचारी अशोक नामदास, जगजीवन करवंदे आणि चालक हनुमंत गायकवाड यांनी सदरील टिप्पर चा पाठलाग करून साळेगाव नजीक पकडण्यात आला. सदरील टिप्पर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अंबाजोगाई येथील आरटीओ कार्यालयाला त्याची माहिती दिल्यानंतर आरटीओ ने त्याचे वजन केले असता ७ टन भरले. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वजन दिसून आल्याने ८२ हजारांचा दंड ठोठावला आहे. तर सदरील वाळू वाहतूक रॉयल्टी प्रमाणे आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी तहसील कार्यालयाला कळवण्यात आले आहे.
           दरम्यान, तहसीलदार रॉयल्टी वैध आहे की नाही हे तपासून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आली.
शेअर करा
Exit mobile version