मुंबई दि.3 – महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालकांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द केल्या असल्याचं म्हटलंय. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात 87 एसपीआरएफ, 30 हजारांवर होमगार्ड तैनात असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस सक्षम, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. पोलीस महासंचलक रजनीश सेठ यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडींवर वक्तव्यही केलंय. कोणीही जातीय तेढ निर्माण केली तर आम्ही त्यावर कडक कारवाई करू, अशा स्पष्ट शब्दांत रजनीश सेठ यांनी कडक इशारा दिला आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तब्बल 15 हजार लोकांवर कारवाई केली असून 149ची नोटीस १३ हजार लोकांना देण्यातील आली, अशी माहिती त्यांनी दिला.
दरम्यान, याचवेळी पुढे बोलताना त्यांनी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्याचं म्हटलंय. पोलिसांच्या सात तुकड्या तैनात असून कुणीही अनुचित प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल, असं रजनीश सेठ यांनी म्हटलंय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, राज ठाकरेंना नोटीस पाठवली की नाही, याबाबत माहीत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. हा विषय पोलीस आयुक्तांकडे असल्यांचं त्यांनी म्हटलंय. मात्र आजच (3 मे) यावर कारवाई होईल आणि औरंगाबादेत पोलीस आयुक्त यावर निर्णय घेतली असंही ते म्हणालेत.