औरंगाबाद दि.6 – कन्नड तालुक्यातील औराळा येथे माजी आमदार स्वर्गीय बाबुरावजी औराळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित व्याख्यान व वार्षिक शेती नियोजन कार्यक्रमात प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी चालू वर्षीच्या हवामान अंदाजाबद्दल भाकीत व्यक्त केले.
पंजाबराव डख म्हणाले की, गेल्या काही वर्षात पृथ्वीचे तापमान वाढल्याने (global warming) आपल्याकडे पावसाचे व गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. आपल्याकडे झाडांचे प्रमाण खूप कमी असल्याने पाऊस धो-धो पडतो व त्यामुळे नुकसानही होते. हे नुकसान टाळण्यासाठी आपल्या परिसरात झाडे लावण्याची आवश्यकता आहे. यावर्षी २ जून पासून पावसाळा सुरू होणार असून यंदाही पावसाचे प्रमाण चांगले असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. तर, “गेल्या साठ वर्षात आपले आयुष्यमान १०० हुन ५० वर्षांवर आले आहे. विज्ञानाने प्रगती केली तर आयुष्यमानही वाढणे आवश्यक होते. मात्र उलटे झाले. यासाठी स्वच्छता गृहाचा वापर, चांगले पिण्याचे पाणी, चांगले अन्न आवश्यक असून गावाच्या सरपंचाने या सुविधा ग्रामस्थांना पुरवणे आवश्यक आहे.
दरम्यान, लोकांकडून पैसे घ्या, चांगल्या सुविधा द्या कारण शासकीय पैशातून असे कामे होणार नाहीत. समाजातील लोकांनी नेमके काय केले पाहिजे म्हणजे त्यांचा विकास होईल हे कर्त्या लोकांनी कधी सांगितलेच नाही त्यामुळे समाज भरकटला असून कर्त्या लोकांनी योग्य दिशा दिल्यास त्यानुसार समाज वागत असतो, असे पेरे पाटील यांनी यावेळी म्हटले