Site icon सक्रिय न्यूज

महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, केज पोलीसांत गुन्हा दाखल…..!

महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, केज पोलीसांत गुन्हा दाखल…..!
केज दि.६ -तालुक्यातील एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचे फोटो  स्टेट्सवर टाकत तिचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली असून पोलिसांनी त्या तरुणास अटक केली आहे.
                तालुक्यात एक १८ वर्षीय तरुणी ही महाविद्यालयात जात असताना सोमेश्वर संदीपान महाडीक याने मोबाईलद्वारे तिचे फोटो काढले. ते फोटो व्हाट्सअप स्टेट्स वर ठेवले. तसेच तिचे मामा व चुलते यांच्या मोबाईल व्हाट्सअपवर पाठविले. तसेच त्या तरुणीचा वाईट हेतुने हात धरून तिचा विनयभंग केला.दि. ५ मे रोजी त्या तरुणीने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार नराधम सोमेश्वर संदीपान महाडिक याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १५६/२०२२ भा. दं. वि. ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ४५२, ५०६ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी सोमेश्वर संदीपान महाडीक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version