Site icon सक्रिय न्यूज

दोन अनोळखी महिलांनी बसची वाट पाहत असलेल्या महिलेचे दागिने लुटले…..!

दोन अनोळखी महिलांनी बसची वाट पाहत असलेल्या महिलेचे दागिने लुटले…..!
केज दि.६ – बसची वाट पाहत बसलेल्या महिलेच्या बॅगमधील पाकिटातील नगदी ३ हजार ५०० रुपये आणि ८६ हजार रुपयांचे दागिने अनोळखी दोन महिलांनी नजर चुकवून लंपास केल्याची घटना केज येथील बसस्थानकात घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
      उस्मानाबाद जिल्ह्यातील देव धानोरा ( ता. कळंब ) येथील प्रियांका दयानंद मस्के ही महिला ५ मे रोजी दुपारी २ ते ३.३० वाजेच्या दरम्यान केज येथील बसस्थानकात बसची वाट पाहत बसली होती. या महिलेने अंगावरील दागिने व नगदी रक्कम पाकिटात ठेवून हे पाकीट कपड्याच्या बॅगमध्ये ठेवले होते. या महिलेजवळ बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी तिची नजर चुकवून बॅगमधील पाकिटात ठेवलेले ३ हजार ५०० रुपये व ८६ हजार रुपयांचे दागिने असा ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. प्रियांका मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी महिलांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version