Site icon सक्रिय न्यूज

बियर शॉपी फोडली, केज पोलीसांत गुन्हा दाखल….

बियर शॉपी फोडली, केज पोलीसांत गुन्हा दाखल….
केज दि.९ -अज्ञात चोरट्यांनी बियर शॉपीच्या शटरचे कुलूप तोडून ४५ हजार रुपये किंमतीचे बियरचे बॉक्स लांबविल्याची घटना सोमवारी ( दि. ९ ) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
       विडा येथील अमोल तुळशीराम ढोबळे यांचे गावापासून १ किमी अंतरावर येवता रस्त्यावर शौर्या नावाची बियर शॉपी असून त्याला लगत हॉटेल ही आहे. रविवारी रात्री ढोबळे हे शॉपी व हॉटेल बंद करून घरी गेले. मध्यरात्री रात्री कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बियर शॉपीच्या शटरचे कुलप तोडून आत प्रवेश केला. किंग फिशर, नॉक आउट, खजुरासह इतर कंपनीच्या बियरचे २२ बॉक्स असा ४४ हजार ८७२ रुपयांचा माल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक बाळू सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अमोल ढोबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक बाळू सोनवणे हे तपास करत आहेत.
————————————————
श्वान पथक पाचारण
———————————————–
विडा येथील बियर शॉपी फोडणाऱ्या चोरट्यांचा तपास लावण्यासाठी बीडच्या श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. शॉपीपासून काही अंतरावर पडलेल्या टॉवेलचा वास घेऊन श्वान परिसरात फिरले. त्यामुळे चोरटे हे वाहनातून गेले असावेत. असा अंदास पोलिसांनी व्यक्त केला.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version