Site icon सक्रिय न्यूज

एकाच कुटुंबातील चौघे ठार, बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना….!

एकाच कुटुंबातील चौघे ठार, बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना….!
बीड दि.११ – आष्टी येथून जवळच असलेल्या धामणगाव घाटात क्रेटा गाडीला बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातात बीडच्या टेकवाणी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
                       बीड येथील टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुणे येथून बीडला क्रेटा गाडीने येत होते. आष्टी जवळील धामणगाव घाटात त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनिल टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतिश टेकवाणी यांच्यासह आणखी एक जणांचा मृत्यू झाला आहे.एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शेअर करा
Exit mobile version