केज दि.१४ – एएसपी पंकज कुमावत यांनी बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही धाडसी कारवाया करून अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणावर आळा घातला आहे.
याचाच एक भाग म्हणून 13/5/ 2022 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात मार्केट यार्ड सोलापूर रोड अंबिका ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर छापा मारून 4 इसमांना जागीच ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून नगदी 56 630 रुपये व जुगाराचे साहित्य 78 850 रुपये असा एकूण 135480 ताब्यात घेऊन 4 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
केला आहे.तर शिवाजी चौक दीपक फुल स्टॉल शेजारी चपने कॉम्प्लेक्समध्ये ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा मारून 6 इसम जागीच ताब्यात घेऊन त्यांचेकडून नगदी नगदी 8880 रुपये व ऑनलाइन जुगाराचे साहित्य 50 400 रुपये असे एकूण 59 280 रुपये चा माल जप्त करून 6 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर हॉटेल नाज शेजारी ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा मारून 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य 115 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच हॉटेल लजीज शेजारील ऑनलाईन जुगार अड्डयावर छापा मारून 5 आरोपींना जागीच ताब्यात घेऊन त्यांचेकडून नगदी 5500 व ऑनलाइन जुगाराचे साहित्य 56 500 असा एकूण 62 000 रु चा माल जप्त करून एकूण 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाज होटेल शेजारी पाथरूड गल्ली येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा मारून 4 आरोपींना जागी ताब्यात देऊन त्यांच्या ताब्यातून नगदी 1625 रुपये व जुगाराचे साहित्य 70000 रुपये असा एकूण 71625 चा माल जप्त करून 4 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आडत लाईन समोरील समोरील टपरी मध्ये कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा मारून 2 इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून नगदी 8700 व मोबाईल किमती 17000 एकूण 25 700 रुपयांचा माल जप्त करून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर साईबाबा ट्रेडर्स येथे छापा मारून एक इसम ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून गोवा गुटख्याचा माल एकूण 529482 रुपयाचा माल ताब्यात घेऊन 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पोलीस ठाणे आनंद नगर हद्दीत तुळजाई शॉपिंग मध्ये सूर्या बिर्याणी हाऊस दुकानात बिंगो जुगार गेम वर रेड मारून 13 इसमांना जागीच ताब्यात घेऊन त्यांचेकडून नगदी 25 370 रुपये व विंगो जुगाराचे साहित्य कम्प्यूटर सी पी ओ व मोबाइल असा एकूण 20500 रुपयाची साहित्य असा एकूण 226870 रुपयाचा माल जप्त करून एकूण 14 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नितीन ऑनलाईन लॉटरी जुगारावर छापा मारून 6 इसमांना ताब्यात घेऊन त्यांची ताब्यातून नगदी2030 रुपय व ऑनलाइन जुगाराचे साहित्य 189 000 एकूण
1 91530 रुपयाचा मालजप्त करून 8 विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंबिका ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर छापा मारून 7 जागीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदि
280 40 रुपये व साहित्य 80 500 असा एकूण 108540 रुपये जप्त करून एकूण 10 रुपये विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हरमन चहा टपरी चे बाजूला मिलन नाईट जुगार अड्ड्यावर छापा मारून 3 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी 6090 रुपये व जुगाराचे साहित्य मोबाईल 17 000 रुपये असा एकूण 23 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एकंदरीत पोलीस ठाणे उस्मानाबाद सिटी येथे 7 ठिकाणी रेड मारून 26 आरोपीना जागीच ताब्यात घेऊन 999067 रु माल जप्त करून एकूण 29 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे.पोलीस ठाणे आनंद नगर हद्दीत 4 ठिकाणी रेड मारून 29 आरोपींना ताब्यात घेऊन 550130 रु असा एकूण 15,49,197 ₹ चा माल जप्त करून मालक असे एकूण 36 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या आदेशावरून केज उपविभाग चे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत स्वतः व सोबत PSI पाटील, PSI घोडे, पीएसआय सारंग , पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, दिलीप गीते, राजू वंजारे, महादेव सातपुते, सचिन अहंकारे, दिगंबर गिरी, श्यामराव खणपटे, रशीद शेख, मंगेश भोले, राम हरी भांडणे, संजय टुले,सत्यप्रेम मिसाळ, आरसीपी पथकाचे 06 जवान, चालक इनामदार व अंगरक्षक भुंबे इत्यादींनी सदरची कारवाई केली आहे.