केज दि.१५ – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संकल्पनेतून राजस्थान मधील उदयपूर येथे तीन दिवसाचे चिंतन शिबीर आयोजित केले आहे. हे नवं संकल्प शिबीर देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारे ठरेल असे मत या शिबिरात सहभागी असलेल्या काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या वर्किंग कमितीच्या सदस्य, जम्मू काश्मीर च्या प्रभारी खा.रजनीताई पाटील यांनी व्यक्त केले.
या शिबिरात देशातील निवडक व प्रमुख ४०० प्रतिनिधींना निमंत्रित केलेले असून यामध्ये पक्ष संघटनेबाबत सोनिया गांधी यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिबिरात राजकिय परिस्थिती, अर्थव्यवस्था, कृषी, सामाजिक न्याय, पक्ष संघटना व युवकांचे सबलीकरण अशा एकूण ६ समित्या गठीत केल्या असून त्यात विचार मंथन केले जाणार आहे. त्यामुळे हे शिबिर पक्षासाठी नक्कीच महत्वाचे आणि पक्षाला नवसंजीवनी देणारे ठरेल असा विश्वास खा.रजनीताई पाटील यांनी व्यक्त केला.