Site icon सक्रिय न्यूज

मोबाईल टॉवरवर चढून चोरी करण्याची अफलातून “आयडिया” ची कल्पना…..!

मोबाईल टॉवरवर चढून चोरी करण्याची अफलातून “आयडिया” ची कल्पना…..!
केज दि.२१ – अज्ञात चोरट्यांनी मोबाईल टॉवरवर चढून आयडिया कंपनीचे रेंज कामी वापरण्यात येणारे ४२ हजार रुपये किंमतीचे आरयुएस कार्ड लंपास केल्याची घटना केज तालुक्यातील सारूळ येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
        केज तालुक्यातील सारूळ येथे इंडस कंपनीचे मोबाईल टॉवर आहे. १८ मे रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास टॉवरजवळ कोणी ही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरटे टॉवरवर चढले. त्यांनी आयडिया कंपनीचे रेंज कामी वापरण्यात येणारे ४२ हजार रुपये किंमतीचे आरयुएस कार्ड ( एकूण ७ कार्ड ) काढून घेत पोबारा केला. कंपनीचे अधिकारी शिवलाल मस्साजी जगताप ( रा. भवानवाडी ता. जि. बीड ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार अशोक मेसे हे करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version