केज दि.२५ – पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना अंतर्गत गंगा माऊली शुगर्स ने आगामी गळीत हंगामाची जोरदार तयारी सुरू केली असून येणाऱ्या हंगामात हा कारखाना ८ लाख टणाचे गाळप करेल या भागातील शेतकऱ्यांना आता उसासाठी कस्था खाण्याची आवश्यकता नसल्याचे
जागृती शुगर इंडस्ट्रीज चे उपाध्यक्ष तथा गंगा माऊली शुगर्स चे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी मील रोलर च्या पूजनाच्या प्रसंगी बोलताना सांगितले.
गंगा माऊली शुगर्स हा कोणत्या पक्षाचा कारखाना नाही तर हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे राजकारण विरहीत ऊस गाळप हा कारखाना करेल त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे चिंता करू नये गंगा माऊली शुगर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहील. पुढच्या हंगामात आपण किमान ८ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून हा कारखाना
खा.रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आदित्य पाटील यांच्या सहकार्याने चालणार असून या हंगामाची तयारी सुरू असून कार्यक्षेत्रातील ऊसाची लागण तारीख घेणे सुरू झालेले असून सर्वांनी लागण तारीख द्यावी जेणे करून गळीत हंगामाच्या वेळी अडचण येणार नाही. हा कारखाना शेतकऱ्यांना योग्य भाव व त्यांचा मोबदला योग्य प्रमाणात देणार असून त्या दृष्टीने मोठया युद्धपातळीवर काम सुरू असून कारखान्याची गाळप क्षमता वाढवली असून ती प्रतिदिन ५ हजार मेट्रिक टन करण्यात आलेली आहे. कारखान्यात लागणारे कर्मचारी याच भागातील आपण घेणार आहोत त्यामुळे या भागातील बेरोजगार तरुणांना देखील याचा मोठा फायदा होणार असल्याचे गंगा माऊली शुगर्सचे चे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी सांगितले.
पुढच्या गळीत हंगामापासून कारखाना शेतकऱ्यांना व सभासदांना वेगवेगळ्या जातीचे व चांगले ऊस उत्पादन असणारे बेणे उपलब्ध करून देणार असून कारखान्याची स्वतंत्र नर्सरी असणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ठिबक सिंचन देखील देण्यात येणार असून शक्य त्या सुविधा देण्यासाठी कारखाना प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर नवीन शेअर्स खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर शेअर्स विक्री केली जाणार असल्याचेही श्री लक्ष्मणराव मोरे यांनी सांगितले.
सुधारित मील रोलरचे पूजन करून यावेळी रोलर बसवण्यात आले यावेळी कार्यक्रमाला गंगा माऊली शुगर्सचे चेअरमन तथा जागृती सहकारी कारखाण्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, अंबासाखर चे उपाध्यक्ष हनुमंत काका मोरे, काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, प्रविण मोरे, अविनाश मोरे, प्रगतिशील शेतकरी लालासाहेब नाना पवार, काँग्रेसचे केज तालुका अध्यक्ष अमर पाटील, बाळासाहेब ठोंबरे, कपिल मस्के, संपादक संतोष मानूरकर, प्रविणकुमार शेप, दलिल इनामदार, लक्ष्मण जाधव, समिर देशपांडे, प्रताप मोरे, संतोष सोनवणे, ताहेर खुरेशी, अरुण गुंड, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक पवार, शेतकी अधिकारी अविनाश आदनाक, चिप इंजि पतंगे, चिप केमिस्ट सरवदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.