केज दि.२५ – पत्नीसोबत सुरू असलेले भांडण सोडवण्यास गेलेल्या पतीसह त्याच्या वडील व भावास दगड व काठीने मारहाण केल्याची घटना लव्हुरी ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी तिघा बापलेकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
लव्हुरी ( ता. केज ) येथील सचिन वसंत पवार हे त्यांच्या पत्नीसोबत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेले असता लाला रुपला पवार याने दगडाने त्यांच्या पायाच्या नडगीवर मारून जखमी केले. त्यांचे वडील वसंत पवार यांना अमोल लाला पवार याने दगडाने मारहाण करीत मुक्कामार दिला. तर सचिन यांच्या भावास नितीन लाला पवार याने काठीने मारहाण केली. त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी ही दिली. अशी फिर्याद सचिन पवार याने दिल्यावरून लाला पवार, अमोल पवार, नितीन पवार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाळू सोनवणे हे करत आहेत.