मुंबई दि.२६ – महाविकास आघाडीतील मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीकडून (ED) छापे आज सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे. सात ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे अनिल परबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावू शकतं. याच्या आगोदर देखील अनिल परब यांची ईडीने चौकशी केली आहे. तसेच त्यांच्यासोबत आरटीओच्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी झाली होती.