केज दि.२६ – ठाण्याहून आलेल्या महिलेने आपल्या वृद्ध सवतीच्या पायावर डाळीचे गरम पाणी ओतल्याने भाजले असून शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना बेलगाव ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी सवतीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बेलगाव ( ता. केज ) येथील कौशल्या महादेव दातार ( वय ६५ ) ही वयोवृद्ध महिला गावी राहून दुसऱ्याकडून शेती वहिती करून उपजीविका भागविते. या महिलेची सवत गंगाबाई महादेव दातार ही ठाणे येथून गावी आली होती. २३ मे रोजी सकाळी नऊ वाजता कौशल्या या शेतातून घरी आले असता त्यांनी घर उघडलेले पाहून घर का उघडले अशी विचारणा केली असता गंगाबाई यांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केली. तर चुलीवर डाळ शिजविलेले गरम पाणी त्यांच्या पायाच्या मांडीवर फेकल्याने कौशल्या दातार यांचा पाय भाजला. गावातील गणपा दातार, भैय्या दातार, भिकु दातार यांनी हा वाद पाहून सोडवा सोडव केली. कौशल्या दातार यांच्या फिर्यादीवरून गंगाबाई दातार या सवतीच्या विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अशोक गवळी हे करीत आहेत.