मुंबई – कोरोनाच्या संकटात आरोग्य तसेच पोलीस खात्याच्या खांद्याला खांदा लावून राज्यातील लाखो शिक्षक कोरोना योद्धे म्हणून काम करत आहेत. वेळप्रसंगी शिक्षकांनी डिलेव्हरी बॉय म्हणून सुद्धा काम करावे लागले. परंतु दिलेल्या कामातुन पळ काढल्यामुळे ठाणे मनपाने 211 शिक्षकांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान ठाणे मनपाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना विविध भागात जाऊन नागरिकांचे ताप मोजण्याचे काम दिले. मात्र यातील तब्बल 211 शिक्षकांनी कामातून पळ काढल्याचा ठपका ठेवत कामात कुचराई केल्या प्रकरणी संबंधित शिक्षकांना नोटीसी बजावल्या असून म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यातील लाखो शिक्षकांनी कोरोना योद्धे म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे. यामध्ये कांही शिक्षकांना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला आहे. मात्र सदरील कारवाईमुळे संबंधित शिक्षकांत खळबळ माजली आहे.