खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांसह शंभरपेक्षा अधिक युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.तसेच राजापेठ पोलीस स्टेशनमध्येही राणा दाम्पत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
परवानगी न घेता स्वागत रॅली काढणे, मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवली. वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असा आरोप राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आलाय. विना परवानगी क्रेन व वाहतुकीला अडथळा निर्माण केला. यापूर्वीही तीन कार्यकर्त्यांवर सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. रात्री उशिरा बारा वाजतापर्यंत राणा दाम्पत्याच्या घरासमोर स्वागताचा कार्यक्रम सुरू होता. रात्री दहा वाजेनंतर लाउडस्पिकरला बंदी असतानाही स्पिकर सुरू होते. दहा वाजले तरी सुद्धा भजन कार्यक्रम सुरूच होता. दसरा मैदान हनुमान मंदिरात लाऊड स्पीकरवर भजन कार्यक्रम सुरूच होता. त्यामुळं पोलिसांनी ही कारवाई केली.
यासंदर्भात रवी राणा म्हणाले, आम्ही बाहेरचा स्पीकर पावणेदहाला बंद केला होता. पोलिसांनी योग्य त्या पद्धतीने कारवाई करावी. या मंदिरात रात्री 2 वाजेपर्यंत भजन कीर्तन चालतात. त्यामुळे नियम मोडला नसल्याचे त्यांनी सांगितले. राणा दाम्पत्य स्पष्टीकरण देत असले, तरी पोलीस त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कोणतीही संधी सोडणार नाहीत, असेच या प्रकरणातून स्पष्ट होत आहे.