Site icon सक्रिय न्यूज

केेेज येथे भाजपाच्या पस्तीस कार्यकर्त्यावर  गुन्हा दाखल

 केज दि.२३ – कोरोना विष्णुचा संसर्ग रोखने व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधक कायदा आणि पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी केज येथील तहसील कार्यालया समोर आंदोलन करणाऱ्या पस्तीस कार्यकर्त्यांवर केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

साथरोग प्रतिबंधक कायदा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून दि.२२ जून रोजी सकाळी १०:३० वा च्या दरम्यान केज येथे शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करिता नुकसान भरपाई देऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी. या आणि इतर मागण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी केज तहसील कार्यालया समोर तिव्र आंदोलन करण्यात आले होते. तसेच तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आंदोलना दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरविण्याचा संभव होऊ शकतो हे माहीत असताना देखील आंदोलकांनी स्वतःच्या जीवाची व इतरांच्या जीवाची पर्वा न करता सोशल डिस्टनसिंग चे पालन न करता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि तहसील आवारात बेकायदेशी गर्दी जमविली म्हणून पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख यांच्या फिर्यादी नुसार तालुका अध्यक्ष भगवान केदार, नंदकिशोर मुंदडा, रमाकांत मुंडे, जिल्हा परिषदप सदस्य विजयकांत मुंडे, विष्णू घुले, सुनिल घोळवे, अजय मुळे, शरद इंगळे, राहुल गदळे, सुरेश आंधळे, गोरख गित्ते, संदीप पाटील, शिवदास थळकरी, कैलास जाधव, विठ्ठलराव शिंदे, संतोष देशमुख, बिभीषण भोसले, अविनाश साबळे, संतोष जाधव, रामराजे तांबडे, सुरेश घोळवे, अतुल इंगळे, खदिर कुरेशी, अर्जुन बनसोडे, विक्रम डोईफोडे, शशिकांत थोरात, काकासाहेब पाळवदे, पांडुरंग भांगे, धनराज साखरे, वैजनाथ तांदळे, विठ्ठल पारखे, शिवाजी भिसे, अंकुश जोगदंड, प्रकाश मुंडे आणि प्रकाश बाळमे या पस्तीस कार्यकर्त्या विरोधात गु. र. नं. २३२/२०२० भा. दं. वि. १८८, २६९, २७०, ३४ सह पोलीस अधिनियम १७ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा
Exit mobile version