Site icon सक्रिय न्यूज

केज अंबाजोगाई रोडवर अपघातात दोघे जखमी…..!

केज अंबाजोगाई रोडवर अपघातात दोघे जखमी…..!
केज दि.१ – केज अंबाजोगाई रोडवरील ढाकेफळ पाटीवर  दुचाकीचा अपघात झाला असून दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत.केजच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई ला हलवण्यात आले आहे. सदरील दुचाकीचा कोणत्या वाहणाबरोबर अपघात झाला हे मात्र स्पष्ट झालेले नव्हते.
             धारूर तालुक्यातील गांजपुर येथील अनिल बंकटी घुगे व वैजनाथ गंगाधर घुगे अशी जखमींची नावे असून त्यांच्या दुचाकीचा अन्य एका वाहणाबरोबर बुधवारी सायंकाळी अपघात झाला. त्यात दोघेही जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला मार लागला असल्याची माहिती आहे.दोघांवरही अंबाजोगाई च्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सदर अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट नाही.
शेअर करा
Exit mobile version