Site icon सक्रिय न्यूज

केज अंबाजोगाई दरम्यान मोठा अपघात, मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता……!

केज अंबाजोगाई दरम्यान मोठा अपघात, मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता……!
केज दि.२ – केज अंबाजोगाई रोडवर अपघाताची मालिका सुरूच आहे. एक दोन दिवसाला या दरम्यान अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्याचाच प्रत्यय आजही आला असून चंदन सावरगाव ते होळ दरम्यान कार आणि रिक्षा चा मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले असून मोठ्या जिवीतहानी ची शक्यता आहे.
                  गुरुवारी दुपारी कार आणि रिक्षा या वाहनांचा अपघात झाला आहे. यात कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पडली असून रिक्षा चे दोन तुकडे झाले आहेत. तर रस्त्यावर एका लहान लेकरासह एक महिला पडलेली असल्याचे प्रत्यक्षदर्शी ने सांगितले असून त्यापेक्षाही जास्त प्रमाणावर जिवीतहानी झाल्याची शंका व्यक्त होत आहे. सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट नसून रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
शेअर करा
Exit mobile version