केज दि.४ – तालुक्यातील कानडी माळी येथे घरात घुसून महिलेच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याप्रकरणी एका विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कानडी माळी येथे दि. ४ जून रोजी दुपारी १ वाजता मनीषा महादेव खाडे ही महिला घरी असताना सदाशिव लक्ष्मण मुंडे (रा. गोपाळपूर ता.धारूर) हा महिलेच्या घरी आला आणि म्हणाला की, तीन वर्षापुर्वीचे ऊसतोडी मधील पैसे तुमच्याकडे फिरले आहेत. ते मला परत द्या नाहीतर माझ्यासोबत चल असे म्हणुन फिर्यादीस ढकलुन देवुन दगड डोक्यात मारुन जखमी केले. तसेच सदर महिलेस व साक्षीदार यांना लाथाबुक्कयांनी मारहाण करुन शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
सदर प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सदाशिव मुंडे याच्या विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना श्री.गित्ते हे पुढील तपास करत आहेत.