केज दि.२५ – तालुक्यातील धनेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर यांची मागील महिन्यात पदोन्नतीवर बदली झाल्याने येथील जागा रिक्त झाली आहे.त्यामुळे लवकरात लवकर जागा भरून काढण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
ऐन पेरणीच्या तोंडावर मॅनेजर नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.तर सध्या सुरू असलेली पीक कर्ज प्रक्रिया रखडली आहे. त्यातच पीककर्ज ऑनलाइन ची मुदत समाप्त होत असताना मॅनेजर नसतील तर शेतकऱ्याचे नुकसान होऊन पुढील पिकासाठी लागणारे पैसे उपलब्ध नाही झाल्यास शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला जाऊ शकतो. यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन मॅनेजर ची मागणी करण्यात आली आहे. तसेच लवकरात लवकर मागणी पूर्ण नाही झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर वीर भगत सिंग विध्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगेश अंबड, संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष राहुल खोडसे यांच्यासह अनिल पवार, शशिकांत खोडसे, सचिन गुजर, कैलास खोडसे आदीच्या स्वाक्षरी आहेत.