Site icon सक्रिय न्यूज

केजमध्ये एएसपी पंकज कुमावत यांची मोठी कारवाई, ७ जणांना जुगार खेळताना पकडले……! 

केजमध्ये एएसपी पंकज कुमावत यांची मोठी कारवाई, ७ जणांना जुगार खेळताना पकडले……! 
केज दि.५ – शहरातील मोंढा परिसरात पोलिसांनी छापा मारून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असलेल्या पंचायत समितीचे माजी सभापती आणि नगरसेवकासह ७ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून नगदी ९ हजार ३०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
      केज शहरातील मोंढा मार्केट येथील कन्हैया ट्रेडर्सजवळील मोकळ्या जागेत काही लोक एकत्र बसुन जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यावरून फौजदार वैभव सारंग, जमादार बालाजी दराडे, संभाजी दराडे, पोलीस नाईक अनिल मंदे, संतोष गित्ते यांच्या पथकाने ५ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अचानक छापा मारला असता पंचायत समितीचे माजी सभापती बालासाहेब रामराव जाधव सह रामचंद्र विठ्ठलराव गुंड (रा. गुंड गल्ली केज), सुशिल सज्जन अंधारे ( दोघे रा. मोंढा मार्केट, केज ), माजी स्वीकृत नगरसेवक शेषराव लक्ष्मण कसबे ( रा. वकीलवाडी, केज ), निरंजन अशोकराव बोबडे ( रा. कळंब रोड, केज ), मनोज पांडुरंग घोरपडे ( रा. समर्थ नगर, केज ), लिंबाजी शंकरराव शिंदे ( रा. समता नगर, केज ) या सात जणांना झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना रंगेहाथ पकडले. त्यांची झडती घेतली असता मिळवून आलेले नगदी ९ हजार ३०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादीवरून वरील सात जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version