Site icon सक्रिय न्यूज

प्रतीक्षा संपली, बारावी निकालाची तारीख जाहीर……!

प्रतीक्षा संपली, बारावी निकालाची तारीख जाहीर……!

मुंबई दि.7 – यावर्षी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता या परीक्षांचा निकाल लागणार आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार उद्या 12 वीचा निकाल लागणार आहे.

                   08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल  दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना

निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती मिळाली असून पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version