Site icon सक्रिय न्यूज

बारावीचा निकाल 94.22 टक्के, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींचीच बाजी…….!

बारावीचा निकाल 94.22 टक्के, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींचीच बाजी…….!
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. मागील वर्षी म्हणजे 2021 मधे कोरोनामुळे बारावीची परीक्षा न होता अंतर्गत मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते. तर त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 90.66 टक्के लागला होता. तर यावर्षीचा निकाल 94.22 टक्के आहे. म्हणजे मागील वेळेपेक्षा यावर्षी बारावीचा निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे.
                 राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा आहे. याशिवाय यंदा निकालात मुलींनी बाजी मारली. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95.24 टक्के आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे.
                    विभागनिहाय निकाल कोकण – 97.22 टक्के पुणे – 93.61 टक्के कोल्हापूर – 95.07 टक्के अमरावती – 96.34 टक्के नागपूर – 96.52 टक्केलातूर –  95. 25 टक्केमुंबई – 90.91 टक्केनाशिक – 95.03 टक्केऔरंगाबाद – 94.97 टक्के. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 93.29 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
               परीक्षेत राज्यातील 5001 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95.24 टक्के आहे.
मार्च- एप्रिल 2022 विषयनिहाय निकाल 1. विज्ञान- 98.30 टक्के 2. कला –  90.51 टक्के 3. वाणिज्य- 91.71 टक्के4. व्यवसायिक अभ्यासक्रम- 92.40 टक्के
या परीक्षेतील 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.राज्यातील पुनर्परीक्षार्थी ( रिपीटर) विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 53.2 टक्के आहे.
            दरम्यान,  ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांच्या अवधित संबंधित विभागाकडे ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल.  त्यासाठी प्रतिविषय 300 रुपये भरावे लागतील.
शेअर करा
Exit mobile version