Site icon सक्रिय न्यूज

कोरोनावर दिलासा : कोविफोर औषधांची निर्मिती

 कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशाला दिलासा देणारी बाब समोर आली असून विषाणूचे जेनेरिक औषध पाच राज्यांना पाठवण्यात आले आहे. हैदराबाद येथील हेटरो कंपनीने रेमडेसिव्हरचे जेनेरिक व्हर्जन ‘कोविफोर’ नावाने तयार केले आहे. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडूसारख्या राज्यांना कंपनी 20 हजार बाटल्या पाठवण्यात आल्या आहेत.

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे कंपनीचे मुख्यालय आहे. तिथे ही या औषधाचा प्रथम वापर होणार आहे. हेटरोच्या मते, कोविफोरच्या 100 मिलिग्रॅम बाटलीची किंमत 5400 रुपये असेल. कंपनीने पुढील तीन ते चार आठवड्यात एक लाख बाटल्यांची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

शेअर करा
Exit mobile version