Site icon सक्रिय न्यूज

सर्पदंशाने महाविद्यालयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू…..!

सर्पदंशाने महाविद्यालयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू…..!
 केज दि.१० – एका ऊसतोड मजुराच्या महाविद्यालयीन मुलीचा विषारी सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील सातेफळ येथे घडली आहे.
                सातेफळ ता. केज येथील उसतोड मजुर रामेश्वर साळुंके यांची मुलगी कु. पायल रामेश्वर साळुंके ही कळंब येथील महाविद्यालयात इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत होती. कु. पायल साळुंके ही दि.९ जून गुरुवार रोजी दुपारी ४ च्या दरम्यान घरी झोपलेली असताना तिच्या डाव्या पायाच्या बोटाला आणि टाचेच्या शिराजवळ विषारी सापाने चावा घेतला. तिला उपचारासाठी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल करून उपचार सुरू होते. मात्र दि. १० जून शुक्रवार रोजी तिचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version